सावधान ! विना मास्क फिराल तर...

Foto
आज मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणारे, थुंकणारे व उघड्यावर कचरा फेकणाऱ्या सुमारे १७० नागरिकांविरुद्ध कारवाई केली.तसेच बायजीपुऱ्यातील राहत हॉस्पिटलला बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर फेकल्यामुळे पाच हजारांचा दंड आकारण्यात आला. 
औरंगाबाद महानगरपालिका , नागरिक मित्र पथक व संबंधित वॉर्ड कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी यांनी पूर्ण ९ झोन मध्ये एकूण ५२,३००  दंड आकारला. यात विना मास्क फिरणाऱ्या एकूण ७० नागरिकांकडून ५०० रुपये प्रत्येकी प्रमाणे ३५,००० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या एकूण ४८ नागरिकांकडून प्रत्येकी १०० रुपये प्रमाणे ४८०० रुपये आणि उघड्यावर कचरा फेकणारे एकूण ५० नागरिकांकडून १५० रुपये प्रत्येकी प्रमाणे ७५०० रुपये असा  एकूण ५२,३०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker